
पावसाचा जोर कमी झाला आहे. मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला आहे. खोल समुद्रात ‘मी डोलकर डोलकर’ म्हणत मासे पकडायला दर्याचा राजा सज्ज होतोय. त्यामुळे लवकरच खवय्याच्या ताटात ताजे, फडफडीत मासे येणार आहेत. वरळी किव्ह लँड बंदरावर कोळी बांधव आपल्या बोटी पाण्यात उतरवताना दिसत आहेत.




























































