कॅनडात पंजाबी तरुणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडातील एका वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या पंजाबी तरुणाला कॅनेडियन तरुणाने मारहाण केली. यादविंदर सिंग असे या पंजाबी तरुणाचे नाव आहे. त्याने मारहाणीचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कॅनेडियन तरुणाने सिंग याच्या नाकावर बुक्का मारला. तो जवळपास 20 मिनिटे जमिनीवर पडून होता. या मारहाणीत त्याची पगडीही खाली पडली होती.