
जिह्यातील सावली तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत आंघोळीसाठी गोसेखुर्द कालव्याकडे गेलेला शाळकरी विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली आहे. नैतिक विठ्ठल शेडमाके (15) असे वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. नैतिक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे लक्षात येताच सोबतचे दोन्ही मित्र घाबरून घरी परत आले. शोधमोहीम राबविण्यात येत असून विद्यार्थ्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.
































































