शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण विभागाकडे लक्ष आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही प्रश्न वचारावे, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी Gen Alpha ला केले आहे. तसेच शिक्षणमंत्र्याचे शिक्षण विभागाकडे लक्ष आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमधून काही शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे वार्तांकन करत एक व्हिडीओ शेअर केला होता. आदित्य ठाकरे यांनी या गावाला भेट देऊन त्या रस्त्याची पाहणी केली. त्यानंतरआदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत. सरकार सांगतंय की पुढच्या वर्षी कुंभ होणार असून मोठ्या प्रमाणात खर्च करणार आहे. देशभरातले विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी आणि सोयीसुविधांसाठी आंदोलन करत आहेत. आम्ही दौऱ्यावर येणार म्हणून प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. काल अधिकारी येऊन गेले पण ज्या रस्त्यावर आपण आज उभे आहोत, त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. शाळेला आम्ही भेट दिली तर त्या शाळेत वर्ग नाही, शौचालय नाही. एका मंदिरात शाळा सुरू होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हाल आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पेशल केस म्हणून एका आमदाराला 18 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. तसेच एक स्पेशल केस करून अशा शाळांना आणि गावांना निधी मिळेल अश तजवीज करावी. सरपंच आणि गावकऱ्यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी हा रस्ता बनवला होता. आणि तो रस्ता टिकेल असं लोकांना वाटलं, पण त्या रस्त्याची डागडुजी केली ती सुद्धा दिसत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच नाशिक हा शिक्षणमंत्र्याचा जिल्हा आहे. पण शिक्षणमंत्र्याचे शिक्षण विभागाकडे लक्ष आहे का? पण राजकारणापलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला मी आलो आहे. देशभरातल्या विद्यार्थ्यांना माझे आवाहन आहे की असे प्रश्न सरकारला विचारत जा. फक्त सत्ताधारी पक्षालाच नव्हे तर विरोधी पक्षाला सुद्धा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, असे आवाहन Gen Alphe ला आदित्य ठाकरे यांनी केले.