
संसदेचे अधिवेशन 19 दिवस चालले, मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे संबंधित मुद्द्यावर विचार करण्यासाठी किमान 25-26 दिवसांचा वेळ होता. तरीही त्यांनी याबाबत विचार केला नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
अमित शाह यांनी दिलेले वक्तव्य हे केवळ जनतेमध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी असल्याची टीका खरगे यांनी केली. ‘मी उत्तर देण्यासाठी तयार आहे’, असा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
अजेंडा पूर्ण झाल्यानंतर तयार झाले
अमित शाह उत्तर देण्यासाठी कधी तयार झाले, असा सवाल करत खरगे यांनी सरकारवर टीका केली. सरकारचा स्वतःचा अजेंडा पूर्ण झाल्यानंतर ते उत्तर देण्यासाठी तयार झाले, असा आरोप त्यांनी केला.
संसदेचे अधिवेशन 19 दिवस चालले आणि सरकारने हे 19 दिवस वाया घालवले. आता मात्र सभागृहाचे कामकाज वाढवण्याची मागणी केली जात आहे, यावरही खरगे यांनी प्रश्न उपस्थित केला.
‘सरकारने 19 दिवस वाया घालवले आणि आता सभागृहाचा वेळ वाढवण्याची मागणी करत आहे. ही लाजिरवाणी बाब आहे,’ अशा शब्दांत खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला.
संसद 19 दिन चली और गृहमंत्री अमित शाह के पास कम से कम 25-26 दिन थे, फिर भी उन्होंने इस बारे में नहीं सोचा।
अमित शाह का बयान सिर्फ जनता में अपनी छवि बनाने के लिए है कि मैं जवाब देने को तैयार हूं।
वे कब तैयार हुए, जब उनका एजेंडा पूरा हो गया। सरकार ने 19 दिन बर्बाद कर दिए और अब… pic.twitter.com/UiYmIKqO5Y
— Congress (@INCIndia) August 13, 2026


























































