तीन वर्षांत मुंबईच्या सर्व लोकल एसी, तिकीट दर वाढवणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व लोकल 2029-30 पर्यंत वातानुकूलित होणार आहेत. मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकलची निर्मिती सुरू आहे. त्यातील पहिली गाडी पुढच्या वर्षी 2027 मध्ये दाखल होईल. लोकल एसी झाल्या तरी सामान्य प्रवाशांवर तिकिटाचा बोजा वाढणार नाही. सेपंड क्लासच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त वरळी डोम येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईची लोकल सेवा अद्ययावत आणि एसी करण्याचा निर्णय आधीच झाला होता. परंतु ते काम गतिमान होणे गरजेचे होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या कामाला वेग देण्याची विनंती सरकारने केली होती. त्यानंतर पेंद्र सरकारने देशातील तीन आधुनिक रेल्वे कोच कारखान्यांमध्ये या लोकलच्या निर्मितीचा निर्णय घेतला.

 तीन कारखान्यांमध्ये काम विभागले गेल्याने लोकलची निर्मिती वेगाने होणार असल्याचा दावा.
 लोकल सेवा मेट्रोसारखीच आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि वातानुकूलित करण्याचे उद्दिष्ट.
 नव्या एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुविधा असणार आहेत.