Nanded News – सुखबीर सिंग बादल यांच्यावर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या तसेच सुरक्षेची काळजी घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण घटनेनंतरही त्यांनी गुरुदर्शनाचे महत्त्व आणि आपली श्रद्धा कायम असल्याचे नमूद करत यावर अधिक संताप व्यक्त न करता प्रकृतीकडे लक्ष केंद्रित असल्याचे संकेत दिले. आपल्या वरील भ्याड हल्ल्याची कसून चौकशी करून त्या मागचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा नी करावा, अशी मागणी ही त्यांनी केली.