
मुख्य बुकर पुरस्कार 2026 साठी निवड झालेल्या पुस्तकांची दीर्घ यादी नुकतीच जाहीर झाली आहे. वार्षिक ‘बुकर पुरस्कार’ हा साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार असून हा पुरस्कार इंग्रजी भाषेत लिहिलेल्या व युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला दिला जातो. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी 13 महत्त्वाच्या साहित्यिक रचनांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीच्या बुकर पुरस्कारासाठीच्या दीर्घ-यादीत स्थान मिळालेल्या लेखकांमध्ये पुलित्झर पुरस्कार विजेती लेखिका एलिझाबेथ स्ट्राउट, डग्लस स्टुअर्ट, मार्लन जेम्स आणि रेबेका पेरी यांचा समावेश आहे. ही दीर्घ यादी ‘बुकर डझन’ म्हणून ओळखली जाते. या निवडक लेखकांमधून संक्षिप्त यादीची निवड होईल, जी 22 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी विजेत्याची घोषणा केली जाईल. नामांकन झालेली दीर्घयादी – ‘द शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट’ – क्लोई अरिडजिस, ‘स्विट्झी’ – एम्मा क्लाइन, ‘हेलन ऑफ नोव्हेअर’ – मॅकेना गुडमन, ‘द एंड ऑफ एव्हरीथिंग’ – एम. जॉन हॅरिसन, ‘द डिसअपिअरर्स’ – मार्लन जेम्स, ‘ब्लॅक बॅग’ – ल्यूक केनार्ड, ‘द रेनोव्हेशन’ – केनान ओरहान, ‘मे वी फीड द किंग’ – रेबेका पेरी, ‘द पाम हाऊस’ – ग्वेंडोलिन रायली, ‘द थिंग्ज वी नेव्हर से’ – एलिझाबेथ स्ट्राउट, ‘जॉन ऑफ जॉन’ – डग्लस स्टुअर्ट, ‘ऑल देम डॉग्ज’ – जमेल व्हाईट, ‘द विव्हिसेक्टर्स’ – मिसूरी विल्यम्स.


























































