
नेपाळ मार्गे हिंदुस्थानात अमली पदार्थांची तस्करी करणाऱया टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांनी या टोळीकडून तब्बल 106 किलोचे चरस जप्त केले असून या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 100 कोटी इतकी किंमत आहे. नेपाळ मार्गे चरस येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.























































