
लहान मुले खेळासाठी नवनवीन कल्पना प्रत्यक्षात साकारत असतात. त्यांच्या कल्पक डोक्याचे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच. मात्र एका लहानग्याने चक्क 4 कुत्र्यांच्या मानेवर काठय़ा दोरीच्या साहाय्याने बांधल्या. या गाडीच्या मागे दोन चाके लावली आणि हा चिमुरडा त्यावर आरुढ असून त्याने हातात दोरी घेतली आहे. कुत्र्यांवर अंपुश ठेवण्यासाठी मुलगा दोरी ओढतोय आणि ही गाडी हळूहळू पुढे सरकतेय. या वाहनावर दोन झेंडेही लावण्यात आले आहेत. हा व्हिडीओ @fitdharmendra या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन कोटी सत्याहत्तर लाख तेहतीस हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एकाने कमेंट केली आहे, ‘माहिष्मती के होनेवाले सम्राट,भयभीत था संसार जिससे उस काल के संहारक, राज माता शिवगामी देवी के प्रिय पुत्र, पुतेन्द्र बाहुबली’ तर अन्य एकाने प्रश्न विचारला आहे की, या रथाचा सर्वात जास्त वेग किती आहे?































































