पालिकेचे जलतरण तलाव आजपासून सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर, पाणी वाचवण्यासाठी महापालिकेने 17 जूनपासून जलतरण तलावांचा पाणीपुरवठा थांबवला होता. मात्र आता तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर महापालिकेची जलतरण तलाव सुविधा पुन्हा सुरू होणार आहे. 16 ऑगस्टपासून जलतरणाची सुविधा सुरू करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी जलतरण तलावांची जलजोडणी पूर्ववत करण्याबरोबरच तलावातील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे आणि जलतरण निर्देशक आणि जीवरक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रविवारपासून सकाळ अथवा सायंकाळच्या सत्रात नागरिकांसाठी जलतरण तलावाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.