
मालमत्तेचा व्यवहार करताना कधीकधी लोकांकडून काही चुका होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना घर, फ्लॅट किंवा अपार्टमेंटचा ताबा मिळण्यास विलंब होतो.
‘महारेरा’ कायद्यानुसार खरेदीदाराला व्याजासह पूर्ण पैसे परत मागण्याचा किंवा ताबा मिळेपर्यंत दरमहा व्याजाच्या स्वरूपात नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे.
नुकसानभरपाई किंवा व्याजाच्या मागणीसाठी खरेदीदार ताबा घेण्यापूर्वीच वकिलाचा सल्ला घेऊन बिल्डरला नोटीस पाठवू शकतो किंवा महारेराकडे अधिकृत तक्रार नोंदवू शकता.
ताब्यासंबंधीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा, कोणत्याही दोषांचे फोटो आणि व्हिडीओ जपून ठेवा आणि बिल्डरकडे लेखी तक्रार दाखल करा.
कलम 18 नुसार ठरलेल्या मुदतीत ताबा न मिळाल्यास तुम्ही प्रकल्पामधून बाहेर पडून भरलेली रक्कम व्याजासह परत मिळवू शकता.



























































