
वेगवान, आरामदायी प्रवास आणि प्रवाशांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसने पहिल्याच वर्षात विक्रमी कामगिरी केली आहे. 11 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत या गाडीने तब्बल 2 लाख 29 हजार 237 प्रवाशांची वाहतूक केली असून, रेल्वेला 31 कोटी 35 लाख 68 हजार 954 रुपयांचा महसूल मिळाला आहे.
पुणे आणि नागपूरला जोडणारी ही सेमी-हायस्पीड रेल्वे सेवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरत आहे. 10 ऑगस्ट 2025 रोजी या गाडीचे उद्घाटन झाले, तर 11 ऑगस्टपासून तिची नियमित सेवा सुरू झाली.



























































