
दादरच्या क्लबमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान हास्यसम्राट, ज्येष्ठ अभिनेते जॉनी लिव्हर ते 30 वर्षांपूर्वी काम करत असलेल्या हिंदुस्थान लिव्हर कंपनीतील जुन्या सहकाऱ्यांना भेटले आणि भावुक झाले. पोलीस कर्मचारी शिवाजी होसमानी यांनी तब्बल तीन दशकांनंतर सर्व जुन्या सहकाऱ्यांची भेट घडवून आणली. शिवाजी यांचे वडील आणि जॉनी लिव्हर यांची घट्ट मैत्री असल्याने त्यांनी पुढाकार घेत हा खास उपक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात जवळपास 50 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत हा क्षण आनंदात साजरा केला. यावेळी जॉनी लिव्हर सर्व जुन्या सहकाऱ्यांना भेटून भावुक झाले आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग, विनोद आणि आठवणींना उजाळा दिला.


























































