
श्रावणाच्या सोमवारी मधेपुरा येथील सिंहेश्वर धाममध्ये गर्दी अनियंत्रित झाल्याने भाविकांमध्ये धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत 8 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जलाभिषेकासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने ही घटना घडली. भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने रांगेत उभे असलेले काही लोक खाली पडले.
यावेळी एका महिला भाविकाचे डोके फुटले. गर्दी नियंत्रणात आणताना कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसालाही दुखापत झाली आहे. तसेच त्यांची वर्दी फाटली. जखमींना जेएनकेटी मेडिकल का@लेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































