
बंगळुरुमध्ये भरधाव कारने वाहतूक सिग्नलवर अनेक जणांना चिरडल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. नवीन असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जीवन विमा नगर वाहतूक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, बंगळुरुमधील कग्गदासपुरा मुख्य रस्त्यावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक सिग्नलवर थांबलेल्या दोन-तीन कार आणि अनेक दुचाकींना भरधाव वेगात आलेल्या बलेनो कारने धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील नवीन हा 50 फूट दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

























































