डंपरची कारला धडक; पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, 6 वर्षांची मुलगी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समोरून येणाऱ्या डंपरने कारला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला तर एक 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये लखनौ-बहराइच राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी 10.30 वाजता हा अपघात घडला.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिंदौराजवळील भुलभुलिया गावाजवळील रॉयल ढाब्यावर नाश्ता करण्यासाठी वळत असताना समोरून येणाऱ्या डंपरने कारला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गाडीतील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर 45 मिनिटांनी अपघातानंतर ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने गाडीचा दरवाजा तोडला.

अपघातात जखमी झालेली एक महिला आणि सहा वर्षाच्या मुलीला सीएचसी बारागाव, मसाउली येथे नेण्यात आले. मात्र महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा वर्षांच्या मुलीला गंभीर अवस्थेत बाराबंकी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर, महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.