Photo – आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात निर्विघ्न पार पडावा यासाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जी/दक्षिण विभाग येथे समन्वय बैठकीला उपस्थित राहून सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर व संबंधित अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत वरळी मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्डे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी, आवश्यक उपाययोजना आणि ऑनलाईन परवानगी या विषयांवर भर देण्यात आला. बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.