कर्नाटकातील भूतानल सरोवरात सहा मृतदेह आढळले, पोलिसांकडून तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील विजयपुरा येथील भूतानल सरोवरात सहा मृतदेह तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत सर्व मृतदेह सरोवरातून बाहेर काढले. सर्व मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 8.00 ते 8.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सर्व मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते, त्यांची ओळख पटू शकली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेह सुमारे दीड दिवसांपासून तलावाच्या पाण्यात पडून होते. तथापि, मृत्यूचे नेमके कारण आणि मृतदेह तलावापर्यंत कसे पोहोचले, हे अद्याप कळलेले नाही.

मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेचे कारण निश्चित करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदन आणि तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.