लखनौ-बंगळुरू इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, प्रवाशांमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनौहून बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. बंगळुरु विमानतळावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असताना विमानातील कर्मचाऱ्यांना बॉम्बच्या धमकीबद्दल माहिती मिळाली. यानंतर, पायलट आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षा नियमांनुसार आवश्यक ती पावले उचलली. बंगळुरू विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान 6E231 हे लखनौहून बंगळुरूला चालले होते. विमान लँडिंगच्या अंतिम टप्प्यात असतानाच विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. बंगळुरू विमानतळावर सकाळी 9.40 वाजता विमान सुरक्षितपणे उतरले. विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना बॉम्बच्या धमकीबद्दल माहिती देण्यात आली. सुरक्षा यंत्रणा आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी सुरू केली.

सध्या विमान सुरक्षित असून तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी झाल्यानंतरच हे स्पष्ट होईल. धमकीच्या स्रोताबाबत तपास सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.