खारघर स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट, हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक बुधवारी दुपारी एका पक्ष्यामुळे विस्कळीत झाली. लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला आणि शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन लोकलमधून सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरले. नंतर पेंटाग्राफची दुरुस्ती करुन लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली. यात जवळपास 10 ते 15 मिनिटे लोकल स्थानकातच उभी होती.

खारघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल स्थानकात येताच ओव्हरहेड वायरमधून धूर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेमुळे सीएसटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.