
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती ‘जैसे थे’च आहे. यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी सातत्याने रस्त्यांची दुरवस्था, आवश्यक सोयी सुविधांचा अभाव यामुळे नाशिक, पुणे औद्योगिक पट्ट्यातून बाहेर पडणारे उद्योग याविषयी बोलत आहे. या ठिकाणच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, उद्योजक त्रस्त असल्याचे जाणवले. याच पार्श्वभूमीवर आज कोकण दौऱ्यावर आहे. उलट अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
































































