अमेरिकेत कठोर नियम लागू, अल्पवयीन मुलांना रात्री 12 नंतर सोशल मीडिया बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करण्यासाठी आता नवे आणि कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार, 18 वर्षांखालील मुलांना रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येणार नाही. याशिवाय, किशोरवयीन मुलांना दिवसातून केवळ दोन तास हे प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी असेल. शालेय दिवसांमध्येही त्यांच्या सोशल मीडिया वापराला निर्बंध घालण्यात आले आहेत.

मेटाचे प्लॅटफॉर्म किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लावत आहेत, असा गंभीर आरोप अमेरिकेतील 29 हून अधिक राज्यांनी केला आहे. या तक्रारीनंतर मेटा कंपनीने अमेरिकेतील विविध राज्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या करारानंतर हा निर्णय घेतला आहे. जवळपास 16.68 बिलियन डॉलरच्या खटल्याचा समझोता झाला, ज्यामुळे मेटाने ही नियमावली स्वीकारली आहे. 18 वर्षांखालील मुला-मुलींना सुरक्षित अनुभव मिळावा आणि त्यांना पंटेंटचे व्यसन लागू नये यासाठी मेटा त्यांच्या अल्गोरिदममध्ये बदल करणार आहे.