
साखरेच्या किंमती वाढल्यामुळे पेंद्र आणि राज्य सरकारवरवर टीकेची झोड उठत असताना भाजपकडून मात्र वाढलेल्या किंमतीची पाठराखण केली जात आहे. मध्य प्रदेशातील संसदीय कार्यमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी तर हद्दच केली. मला वाटते साखर आणखी खूप महाग व्हावी. ती 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मिळू नये, असे म्हटले.
सणासुदीआधी साखरेच्या वाढत्या किंमतींवर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, आजकाल 90 टक्के लोकांना गोड मिठाई आवडत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अजिबात मिठाई खात नाही. ती फक्त मुलांसाठी दुकानांवर स्वस्त दराने मिळावी, वयस्करांना साखर अजिबात देऊ नये. साखरेपासून पूर्णपणे दूर राहा, असे ते म्हणाले.



























































