
सरन्यायाधीश सूर्य कांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यास विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडियाने 12 सप्टेंबर रोजी होणारा दीक्षांत समारंभ रद्द केला आहे. विद्यापीठाने याबाबत आज माहिती दिली. गेल्या महिनाभरात दीक्षांत समारंभ रद्द झाला किंवा प्रमुख पाहुणे बदलले, असे हे चौथे विद्यापीठ आहे.
विद्यापीठाने आज एक निवेदन जारी केले. त्यात दीक्षांत समारंभ रद्द करत असल्याची माहिती देण्यात आली. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या विरोधाचा उल्लेख नाही. मात्र हा समारंभ रद्द झाल्यानंतर विद्यार्थी त्यांची पदवी किंवा प्रमाणपत्र कुरियरने मागवू शकतात किंवा विद्यापीठातून घेऊ शकतात, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.





























































