
पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन पुजाऱ्याला कॅनडात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्रनाथ दूधनाथ मारज असे आरोपीचे नाव असून, तो न्यूयॉर्कचा रहिवासी आहे. आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी एक धार्मिक विधी करण्यासाठी अमेरिकेतून एका हिंदू पुजाऱ्याला बोलावले होते. यादरम्यान आरोपीने पीडितेला तिच्यावर दुष्ट शक्तींचा ताबा आहे. त्यामुळे तिला बरे करण्यासाठी एका विशेष धार्मिक विधीची गरज आहे, असे पटवून दिले. त्यानंतर तो तिला एका खाजगी ठिकाणी घेऊन गेला आणि धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

























































