
शासनाने कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची आंबा काजूची नुकसान भरपाई जाहीर केली असून ते गावातून नुकसान भरपाईची यादी जाहीर झाली आहे. त्याप्रमाणे बहुसंख्य शेतकऱ्यांनी केवायसी ही केली आहे मात्र सुमारे महिना उलटून गेला असून अद्याप त्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नसल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आजही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
शासनाच्या या नुकसान भरपाईसाठी शेतकरी वर्ग दोन-चार दिवसांनी आपल्या बँक खात्याची रक्कम जमा झाल्याबाबत चौकशी करत असतो मात्र बँकेत गेल्यानंतर त्याची निराशाच होते कारण त्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम सर्व कागदपत्र पूर्ण केल्यावर ही जमा नसल्याने हाताशी होऊन परत येतो शासनकर्त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्र पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित द्यावी अशी मागणी होत आहे.
सरसकट कर्ज माफ या शासनाच्या घोषणेने आज शेतकरी गोंधळात सापडला आहे कारण दोन लाखापर्यंत ची कर्ज सरसकट माफ करणार ही शासनकर्त्यांची घोषणा आज शेतकऱ्यांना खुश करून गेली मात्र सर्वच बँक अधिकारी याबाबत असे सांगत असतात की ज्या शेतकऱ्यांची दोन पर्यंत कर्ज थकीत आहेत अशांचीच कर्ज माफ होणार असून नियमित कर्ज भरणाऱ्यांची कर्ज माफी नसून त्यांना सानुग्रह 50 हजार रुपयांची शासनाकडून मदत करण्यात येणार असून ती सध्या मिळणार नसून काही महिन्या नंतरच जमा होईल असे सांगण्यात येते. मात्र थकवणाऱ्या कर्जदारांना दोन लाख रुपयांची कर्ज माफ केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
याबाबत शेतकरी वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून सरसकट दोन लाख कर्ज माफ केली जाणार या वाक्याचा अर्थ अद्याप पर्यंत शेतकरी वर्गाला कळला नसून आजही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आपली दोन लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ होणार या आशेवर असून शासनकर्त्यांनी याचा संबंधित घोषणेचा खुलासा करावा व आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना निराश न करता त्यांनाही सरसकट दोन लाखाची कर्ज माफ करावी अशी मागणी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी वर्गाची आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना आंबा काजूची नुकसान भरपाई मिळणार आहे व ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांना गणपती सणापूर्वी तरी त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.



























































