
नेपाळ-तिबेट सीमेवर असणारे पाण्याचे नैसर्गिक बांध पुन्हा फुटल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण पुराचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महापुराचा इशारा देण्यात आल्याने नेपाळ सरकारची चिंता वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
तिबेटमध्ये तलाव फुटल्याची अधिकृत सूचना मिळाली असून प्रत्यक्ष नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. सध्या पाणी किती उंचीवरून वाहत आहे, याचा अचूक अंदाज बांधणे कठीण झाले आहे, असे रसुवा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिली. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पाळमधील छोछेन खोला आणि पुरेपू सांगपो नद्यांच्या संगमाजवळ सुमारे 20 लाख घनमीटर पाण्याचा साठा असलेला एक मोठा तलाव तयार झाला होता. गुरुवारी सकाळपासूनच हा तलाव ओव्हरफ्लो लागला होता, असे चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच तलावातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने आणि पुराचा धोका निर्माण झाल्याने केरुंग सीमावर्ती भागात चीनने आपले बचावकार्य तात्पुरते थांबवले आहे. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात सुरू असलेले हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य पुढील 90 मिनिटांसाठी थांबवण्यात आले आहे.
सिचुआन प्रांतात भूकंपाचा धक्का
एका बाजूला महापुराचे संकट असतानाच, तिबेटला लागून असलेल्या चीनच्या सिचुआन प्रांतात शुक्रवारी 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे या भागात भूस्खलन आणि आपत्तीचा धोका अधिक वाढला आहे. सध्या नेपाळ आणि चीन दोन्ही देशांचे प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
📈 Magnitude 5.0 earthquake confirmed near 19 km NW of Fuji, China.
Magnitude: 5.0
Location: 19 km (12 mi) NW of Fuji, China
Date: 2026-08-28 & Time: 01:13 PM (Local Time)#earthquake #seismic #breaking #alert #China pic.twitter.com/s4N48Y5CbC— Earthquake Alerts (@Earthquake2day) August 28, 2026


























































