कर्ज घ्या आणि आरामात फेडा; गरजवंतांना लाखोंचा ऑनलाइन चुना, करंजाडेतून चार भामट्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरजवंताला अक्कल नसते हे हेरून त्यांना बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विविध वित्तीय संस्थांमधून कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन लुटमार करणाऱ्या टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कर्ज घ्या आणि आरामात फेडा, अशी बतावणी करणाऱ्या भामट्यांचा करंजाडे भागात भाड्याने फ्लॅट घेऊन तेथून इंटरनेट, लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. या आरोपी चौकडीने देशभरात अनेकांची ऑनलाइन लूट केली असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजाडे परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमधून काही व्यक्ती लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या सहाय्याने बनावट कॉल सेंटर चालवत असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाली होती. आरोपी स्वतःची ओळख लपवून सर्वसामान्य नागरिकांना फोन करत होते. ते ‘धनी फायनान्स’ तसेच इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन देत होते. त्यानंतर प्रोसेसिंग फी, विमा शुल्क, होल्डिंग चार्ज, जीएसटी आदी विविध कारणे सांगून नागरिकांकडून स्कॅनरद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेत मोठ्या प्रमाणात फसवणूक करत होते.

आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे नवी मुंबई आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने करंजाडे येथील निलगिरी अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकला