
>> जी. के. पवार
महिलांच्या प्रसूतीविषयक समस्यांबाबत आजही खुलेपणाने बोलले जात नाही. यात गर्भपाताबाबत तर आजही फार संवाद होत नाही. हा संवाद घडवून आणण्याचे, महिलांचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम करणारा उपक्रम म्हणजे `ब्रेक द सायलेन्स.’
महिलांच्या आरोग्यविषयक समस्येत त्यांच्या प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्या मुख्य आहेत. महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱया या समस्यांमध्ये मुख्य आहे ती गर्भपात आणि त्यानंतर उद्भवणारी गुंतागुंत. विशेषत कामाच्या ठिकाणी याबाबत स्त्रियांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. जगातील सर्वात मोठय़ा स्वतंत्र अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱया क्वेस्ट ग्लोबल या कंपनीने स्त्रियांच्या या आरोग्यविषयक समस्येत पुढाकार घेत त्यांच्याद्वारे `ब्रेक द सायलेन्स’ ही राष्ट्रीय मोहीम राबवली जात आहे. कामाच्या ठिकाणी गर्भपाताच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यावर ही मोहीम विशेष लक्ष केंद्रित करते. क्वेस्ट ग्लोबलने भ्दल्उदन् च्या सहकार्याने केलेल्या मूळ संशोधनावर ही मोहीम आधारित आहे. या मोहिमेसाठी देशभरातील 25 ते 39 वयोगटातील 2000 महिला आणि 200 पुरुषाचे सर्वेक्षण करण्यात आले असून यात स्टेम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱयांचा समावेश होता.
यातील अभ्यासानुसार दिसून आले की, बहुतांश स्त्रिया निमूटपणे हा त्रास सहन करतात. यातील मुख्य कारण आहे ते नोकरीबाबतची भीती. याचा नोकरी जाण्यात किंवा करिअरवर विपरीत परिणाम होण्याची भीती महिलांना वाटते. तसेच गर्भपातामुळे महिलांच्या कार्यक्षमतेसोबतच आत्मविश्वासावरही परिणाम दिसून येतो.
`ब्रेक द सायलेन्स’ या उपामाबाबत क्वेस्ट ग्लोबलचे सह-संस्थापक आणि सीईओ, अजित प्रभू यांनी मत व्यक्त केले की, `बऱयाच काळापासून गर्भपात ही बाब कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित राहिली आहे. यात अनेक महिलांना आपले काम सुरू ठेवत हे दुःख मुकाटय़ाने सहन करावे लागते. ज्याचा परिणाम उत्पादकता, आत्मविश्वास, नोकरी, करिअर यावर दिसून येतो. म्हणूनच हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही; तर हा कर्मचारी वर्गाचाही प्रश्न आहे. गर्भपाताबाबतचे वास्तव स्वीकारत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठीच हा प्रयत्न आहे.’
क्वेस्ट ग्लोबलने भ्दल्rअएऊ सोबत एक कार्यक्षम व्यवस्था सुरू केली आहे. यात गर्भपातानंतर समुपदेशनासाठी विशेष प्रशिक्षित मानसोपचार तज्ञ, गोपनीय मदतीसाठी 24-तासांची हेल्पलाइन, समवयस्कांसाठी सहाय्य गट, एचआर व्यावसायिक आणि व्यवस्थापकांना संवेदनशील विषय हाताळण्यासाठी प्रशिक्षण, जागरूकता निर्माण करणारे परिसंवाद, इतर उपयोगी माहिती या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवा क्वेस्ट ग्लोबल भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेपर्यंत विनामूल्य पोहोचवत आहे.ज्यायोगे एक नियोजनबद्ध मार्गदर्शन सेवा स्त्रियांना प्राप्त होत आहे.
या उपक्रमागील उद्देश हाच आहे की, गर्भपातानंतर महिलांना ज्या नैराश्याला आणि आरोग्यविषयक समस्येला सामोरे जावे लागते, त्यातून त्यांना बाहेर काढणे. या कृतीमुळे कार्यालयीन ठिकाणी मोकळे वातावरण राहण्यास मदत होऊन कर्मचाऱयांमध्ये सकारात्मक वातावरण कायम राहील. यामुळेच हा एक धोरणात्मक व्यावसायिक उपक्रमही ठरत आहे. किंबहुना, गर्भपाताच्या काळात आधार देणारी कंपनी हे महिलांसाठी केली गेली महत्त्वाची कृती ठरत आहे.
एखादी महिला जेव्हा असे मानसिक, शारीरिक ओझे पेलत असतानाही जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा मिळणारा आधार ही काही साधी गोष्ट नाही. असा आधार तिला त्या संस्थेचा एक भाग वाटण्यास, तिथे टिकून राहण्यास आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतो. जर अधिक स्त्रियांनी नोकरीत टिकून राहावे आणि नेतृत्वाची धुरा सांभाळावी असे आपल्याला वाटत असेल, तर स्त्रियांच्या अशा मूलभूत समस्या जाणून घेत त्यांच्यासाठी एक प्रणाली तयार होणे गरजेचे आहे. गर्भपात हा असाच कठीण प्रसंग आहे आणि अशा वेळी कामाच्या ठिकाणाहून मिळणारा आधार खूप मोठा फरक घडवून आणू शकतो, असे प्रतिपादन `क्वेस्ट ग्लोबल’च्या चीफ स्ट्रटेजी ऑफिसर युमी क्लेव्हेंजर-ली यांनी केले आहे.
या संशोधनाने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. स्त्रिया हे दुःख एकटय़ाने पेलतात, त्या स्थितीतही आपले काम करत राहतात आणि क्वचितच मदत मागतात; कारण तसे केल्यास त्यांना व्यावसायिक पातळीवर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. केवळ एखाद्या धोरणामुळे यात बदल होत नाही. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा कामाच्या ठिकाणी याबाबत मौन बाळगण्याची गरज वाटत नाही. `क्वेस्ट ग्लोबल’च्या `ब्रेक द सायलेन्स’ या उपक्रमाने हे सिद्ध केले आहे. म्हणूनच `ब्रेक द सायलेन्स’ हा केवळ एक उपाम न राहता एक लोक चळवळ बनायला हवी. ज्यामुळे संपूर्ण भारतात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.





























































