एव्हरेस्ट हिंग विक्रीवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स आणि लालजी गोधू अँड कंपनीच्या हिंग पावडर विक्रीवर बंदी घातली आहे. हिंग पावडर निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलेले हिंगाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. नियमानुसार, हिंगातील मिश्रणाचे प्रमाण किमान ५ टक्के असायला हवे, मात्र ते शून्य टक्के आढळले; तर पिवळ्या आणि काळ्या हिंग पावडरचे नमुनेदेखील दर्जाची पूर्तता करू शकले नाहीत. ‘एव्हरेस्ट’ने हिंगाच्या सर्व प्रकारच्या पावडरची विक्री तत्काळ बंद करावी, असे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे. उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठीचा कृती आराखडा सादर करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत.