हे करून पहा – पांढरे केस होतील काळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदामाच्या तेलामध्ये आवळ्याचा रस टाकून डोक्याला रोज लावल्याने पांढरे केस काळे होतात.

आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा आणि 10 मिनिटानंतर केस धुवा. आठवडय़ातून एकदा केसांना लावा.

पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहा पावडर टाका. पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने केस धुवा.

नारळाच्या तेलात थोडा लिंबाचा रस आणि कढीपत्त्याची पाने टाका. पाने काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळीच्या 10 मिनिटे आधी डोक्याची मालिश करा.