अमेरिकेने घेतला व्हेनेझुएलाच्या 65 अब्ज बॅरेल कच्च्या तेलाचा ताबा, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जवळपास 65 अब्ज बॅरेलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा साठा ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात व्हेनेझुएलासोबत करार केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. हा साठा एवढा प्रचंढ आहे की, हिंदुस्थानच्या कच्च्या तेलाची सुमारे 40 वर्षांची गरज त्यातून पूर्ण होऊ शकते.

व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचे उत्खनन करणाऱया एका खासगी कंपनीसोबत अमेरिकेने भागीदारी केली आहे. करारानुसार, उत्खनन होणाऱया तेलापैकी 55 टक्के हिस्सा अमेरिकेला मिळणार आहे. या कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अमेरिकेकडे स्वतःचा 46 अब्ज बॅरेल एवढा साठा आहे. या करारामुळे अमेरिकेतील तेलाचा साठा दुप्पट होईल. व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा असून तेथे सुमारे 300 अब्ज बॅरेलपेक्षा जास्त कच्चे तेल असल्याचा अंदाज आहे. मात्र, आर्थिक संकट आणिग गुंतवणुकीची कमतरता यामुळे तेलाचे उत्खनन कमी होते.

हिंदुस्थानला 40 वर्षे पुरेल एवढा साठा

65 अब्ज बॅरेल कच्चे तेल हिंदुस्थानची 40 वर्षांची गरज भागवू शकते. हिंदुस्थानात दरवर्षी सुमारे 1.6 ते 1.7 अब्ज बॅरेल एवढे कच्चे तेल आयात होते. यावरून, हा तेलाचा साठा किती प्रचंड आहे, हे लक्षात येईल.