यूएस ओपनचा रणसंग्राम आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा थरार रविवारपासून सुरू होत आहे. 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान यूएस ओपन रंगणार आहे. गतविजेते कार्लोस अल्काराझ आणि आर्यना सबालेंका यांच्यासमोर मुकुट कायम राखण्याचे आव्हान आहे. चार महिन्यांनंतर कोर्टवर परतणारा अल्काराझ तिसऱ्या यूएस ओपन विजेतेपदासाठी सज्ज आहे.

सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच 25व्या ग्रँडस्लॅमच्या शोधात असून, अलेक्झांडर झ्वेरेव्ह, फेलिक्स ऑझे-अलियासिम, अॅलेक्स डी मिनॉर, बेन शेल्टन, दानिल मेदवेदेव यांच्यावरही नजर असेल. सिनसिनाटीचा मास्टर्स विजेता आर्थर फिल्स धक्कादायक निकाल देऊ शकतो. महिला गटात सबालेन्का, एलीना रायबाकिना, कोको गॉफ, मिर्रा अँड्रीव्हा, जेसिका पेग्युला, इगा स्वियातेक आणि अमांडा अनिसिमोव्हा प्रमुख दावेदार आहेत.