
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमधील दोन जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए. के. ज्योती यांनी बीसीसीआय घटनेतील नियम 28अंतर्गत निवडणुकीची घोषणा केली असून 18 सप्टेंबरला होणाऱया वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान होणार आहे. आयपीएलच्या चारपैकी दोन जागांसाठी ही निवडणूक होणार असून ही निवडणूक बिनविरोध मानली जात आहे. आयपीएलच्या गव्हार्ंनग काwन्सिलमध्ये जनरल बॉडीचे चार सदस्य असतात. त्यापैकी दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र सध्याचे हिमाचल प्रदेशचे अरुण सिंह धूमल (अध्यक्ष) आणि मिझोरामचे खैरुल जमाल मजूमदार यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. दोघांनाही बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र दोघांना पुढच्या वर्षी पुन्हा निवडणूक लढवावी लागणार आहे.




























































