
स्मार्टवॉचच्या वॉच-फेस अॅप्सशी संबंधित एका प्रकरणात सॅमसंगला मोठा धक्का बसला आहे. यूके उच्च न्यायालयाने स्विस घडय़ाळ कंपनी ‘स्वॉच ग्रुप’ला 11.6 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 110 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश सॅमसंगला दिले आहेत. ट्रेडमार्क उल्लंघनासंदर्भातील हे प्रकरण आहे.


























































