
पैठणी म्हणजे महाराष्ट्राचे महावस्त्र… घराघरांत पोहोचलेले. सणासाठी, लग्नसमारंभासाठीही पैठणीची वेगळीच व्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते. मात्र ओरिजनल पैठणी म्हणत सेमी आणि डुप्लिकेट पैठणीदेखील बाजारात विकली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने ओरिजनल पैठणीवर बारकोड अन् लोगो लावण्याची शक्कल लढवली आहे.
खऱया पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय, कोणत्या गावात कोणत्या कारागिरांनी ही पैठणी तयार केली याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार असल्याची माहिती राज्याचे वस्त्राsद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पंढरपूर येथे दिली.
सावकारे यांनी सांगितले…
पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. तसेच हस्तकौशल्याचा भाग आहे. एक पैठणी तयार करायला 20 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू असल्याचे सावकारे यांनी सांगितले.




























































