मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओबीसी समाजाच्यावतीने 1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात आंदोलक दाखल झाल्यास त्याचा वाहतूक व अन्य आपत्कालीन सेवांवर परिणाम होऊ श‘कतो अशा कारणास्तव पोलिसांनी आंदोलनास परवानगी दिलेली नाही.

आझाद मैदान परिसरात अनेक रुग्णालये, महत्त्वाची कार्यालये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्या परिसरात रोज लाखो लोकांची वर्दळ असते. त्यात मोठय़ा संख्येने आंदोलकही आल्यास मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ओबीसी आंदोलनासाठी राज्यभरातून आंदोलक येणार होते.