आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने हजारो कोटी रुपये थकवल्यामुळे निराश झालेल्या कंत्राटदारांनी आत्महत्येसारखा शेवटचा पर्याय स्वीकारल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. गेल्या काही महिन्यांत सात कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या. आज उदगीरमध्ये आठव्या कंत्राटदाराने आपले जीवन संपवले. उदगीरच्या वायगाव येथील 50 वर्षीय दयानंद बाबुराव हुल्ले यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. मात्र हुल्ले यांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद असलेली डायरी पोलिसांना नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यातील नोंदींवरून पोलीस पुढील तपास करत आहेत.