
देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू असून सेंट्रल झोन आणि ईस्ट झोनमध्ये सध्या सामना सुरू आहे. बंगळुरुतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलन्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत ईस्ट झोनकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. सेंट्रल झोनचा पहिला डाव 266 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी ईस्ट झोनकडून सलामीला उतरले. दोघांनी दीडशे धावांची भागिदारी करत ईस्ट झोनला दमदार सलामी दिली. या दरम्यान वैभवीने दुलीप ट्रॉफी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले आणि नवीन इतिहास रचला.
सेंट्रल झोनविरुद्ध अर्धशतक ठोकत वैभव सूर्यवंशी याने दुलीप ट्रॉफीतील 57 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. वैभवने फिरकीपटू सारांश जैनला षटकार ठोकत 42 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या 15 वर्षे 157 दिवस वयाचा वैभव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम लक्ष्मण सिंह यांच्या नावावर होता. त्यांनी 1969 मध्ये वयाच्या 16 वर्षे 23 दिवस वयात अर्धशतक केले होते.
Youngest & Fearless: The Unstoppable Record-Breaks of Vaibhav Sooryavanshi.
Age is just a number when talent meets relentless dedication! Bihar’s prodigy Vaibhav Sooryavanshi continues to rewrite history across domestic and international stages. pic.twitter.com/m6iQOHppmz— Bihar Cricket Association (@BiharCricAssoc) August 31, 2026
सचिनचा विक्रम थोडक्यात हुकला
दरम्यान, धडाकेबाज फलंदाजी करणारा वैभव 81 चेंडूंत 92 धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. हर्ष दुबेने बाद करण्यापूर्वी जर वैभवने शतक झळकावले असते, तर सचिन तेंडुलकरचा (17 वर्षे 262 दिवस) 36 वर्षे जुना सर्वात तरुण दुलीप ट्रॉफी शतकवीराचा विक्रमही मोडीत निघाला असता. याशिवाय पंजाबच्या ध्रुव पांडोव (14 वर्षे 293 दिवस) नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो देशातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला असता.
दुलीप ट्रॉफीतील सर्वात तरुण अर्धशतकवीर
- वैभव सूर्यवंशी (2026) – 15 वर्षे 157 दिवस
- लक्ष्मण सिंह (1969) – 16 वर्षे 23 दिवस
- पीयुष चावला (2005) – 16 वर्षे 307 दिवस

























































