
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या हल्द्वानीत शुद्धीकरणानंतर FIR ची मागणी केली मात्र उलट त्यांच्याविरोधातच FIR दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशा प्रकारे गैरकारभार करणाऱ्या भाजपच्या या हुकूमशाही राजवटीचा तीव्र निषेध रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया वरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, देशात शुद्धीकरणाच्या नावाखाली दलित आणि वंचित घटकांसह थेट राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याचा जाहीर अवमान केला जात आहे. या सर्व प्रकाराकडे भाजप सरकार डोळे झाकून पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला. या अन्यायाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला असता, यंत्रणांचा गैरवापर करून त्यांच्यावर उत्तराखंडमधील हल्द्वानी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशा प्रकारे गैरकारभार करणाऱ्या भाजपाच्या या हुकूमशाही राजवटीचा तीव्र निषेध रोहित पवार यांनी केला आहे.
देशात शुद्धीकरणाच्या नावाखाली दलित आणि वंचित घटकांचाच नाही तर थेट राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्याचा जाहीर अवमान केला जातो आणि भाजप सरकार डोळे झाकून बसतं, पण जेंव्हा या अन्यायाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांनी आवाज उठवला तेंव्हा यंत्रणांचा गैरवापर करून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 31, 2026
आज देशातील प्रत्येक नागरिक भाजपच्या दबावाला घाबरण्याच्या पलीकडे गेला आहे, असे नमूद करत त्यांनी राहुल गांधी भाजपच्या या दबावाला किंवा सत्तेच्या व कायद्याच्या गैरवापराला अजिबात घाबरणार नाहीत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी भाजपला रोखून धरले असून जनतेच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, न्यायासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्यांची ही लढाई यापुढेही अशीच सुरू राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
























































