
महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तडीपार गुन्हेगारासह चारजणांना अटक केली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.
मीरा रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक आक्षेपार्ह व्हिडीओ आला. पश्चिमेतील माहेश्वरी भवन रोडवरील हिटमॅन टर्फच्या बाहेर हा व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी अंश साहिल (२१) हा तडीपारी गुंडासह वासुदेव सिंह (२२), पियुष सिसोदिया (२२) आणि नितेश शर्मा (१८) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी दारूच्या नशेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख करत अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती.






























































