धनुष्यबाणाची आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाचे प्रकरण तसेच गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पूर्ण केला असून उद्या शिंदे गटाचे वकील बाजू मांडणार आहेत.