
सीईटी परीक्षेत मिळालेल्या अधिकृत गुणांशी विसंगत असलेल्या स्कोअरकार्डच्या आधारे प्रवेशाचा कायदेशीर हक्क मागता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्याचा बी.टेक. प्रवेश कायम ठेवण्यास नकार देत मागणी फेटाळून लावली. शुभम मंगिरे याने एमएचटी-सीईटी २०२६ ची पीसीएम गटाची परीक्षा दिली. सुरुवातीला त्याच्या स्कोअरकार्डमध्ये पहिल्या प्रयत्नात एकूण ७८.८७, तर दुसऱ्या प्रयत्नात ७३.५४ पर्सेंटाइल असल्याचे दाखवण्यात आले होते. त्या आधारे विद्यापीठाने त्याला बी.टेक. रिन्यूएबल एनर्जी इंजिअनरिंग अभ्यासक्रमाला तात्पुरता प्रवेश दिला. स्कोअरकार्डमधील विसंगती निदर्शनास आल्यानंतर विद्यापीठाने प्रवेश रद्द केला. याविरोधात त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
























































