
मुंबई महापालिका आयुक्तांनी आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मानित केलेल्या ‘बी’ विभाग कार्यालयातील अधिकारी कविता डोके या सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा सेवापूर्ती सोहळा ‘बी’ विभाग कार्यालयात पार पडला. कार्यक्रमात विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे आणि विभाग कार्यकारी अभियंता राकेशकुमार झा यांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन डोके यांना गौरवण्यात आले. यावेळी विभागातील आजी-माजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





























































