नोकरी गेल्यास 60 दिवसांत अमेरिका सोडावी लागणार, एच-1बी व्हिसाधारकांसाठी आता नवे संकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेत जाण्यासाठी आणि तेथे नोकरी करण्यासाठी महत्त्वपूर्ण अस्तालेल्या एच-1बी व्हिसावर आता नवीन संकट आले आहे. अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जवळपास 10 हजार हिंदुस्थानी नागरिकांना नोकरी गमवल्यानंतर अमेरिका सोडावी लागली आहे. 60 दिवसांत दुसरी नोकरी मिळाली नाही तर अमेरिका सोडावी लागते, या नियमामुळे एच-1बी व्हिसाधारकांसाठी नवे संकट निर्माण झाले आहे.

अमेरिकन सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेसच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये जवळपास 5,100 हिंदुस्थानी व्यावसायिकांना अमेरिका सोडावी लागली होती. ट्रम्प हे 60 दिवसांची मुदत संपण्यावर ठाम आहेत. हा नियम रद्द करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडले जाईल.