
एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा जेवणात मायक्रोफोनच्या आकाराचा मसाल्याचा एक तुकडा पाहतो आणि गमतीने विचारतो की, त्याने जेवण चालू ठेवावे की गाणे सुरू करावे. व्हिडीओमध्ये तो मुलगा जेवणातील त्या लहान आणि अनपेक्षित आकाराच्या तुकडय़ाकडे बारकाईने पाहतो. तो तुकडा एखाद्या छोटय़ा मायक्रोफोनप्रमाणे हातात धरतो. तो एक निरागस आणि मजेशीर प्रश्न विचारतो की त्याने जेवण पूर्ण करावे की गाणे सुरू करावे? त्याच्या या गोंडस प्रतिक्रियेमुळे नेटीझन्सनी त्याला ‘भविष्यातील गायक’ म्हटले आहे. हा व्हिडिओ @onlybrief या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 2.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

























































