
ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या चांगल्या संकेतामुळे हिंदुस्थानी शेअर बाजार शुक्रवारी वधारला. 30 शेअरचा इंडेक्स सेन्सेक्स 362 अंकांनी वाढून 76,515 अंकांवर बंद झाला, तर 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 24.25 अंकांनी वाढून 23,897 अंकांवर बंद झाला. मार्केट बंद दरम्यान सेन्सेक्स 30 शेअर्सपैकी 20 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. बाकीच्या 10 शेअर्समध्ये घसरण झाली.
सेन्सेक्स आज 76,657 अंकांवर उघडला. मार्केट बंद झाले. त्यावेळी सेन्सेक्स 0.48 टक्क्यांनी घसरून 76,515.43 अंकांवर बंद झाला. निफ्टीची ओपनिंग 23,910.90 अंकांवर झाली. मार्केट बंद झाले त्यावेळी 0.10 टक्के वाढून 23,897.70 अंकांवर बंद झाला. सर्वात जास्त वाढ टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पाहायला मिळाली. टाटा स्टील 2.91 टक्के वाढून 189 वर बंद झाला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज 1.61 टक्क्यांसोबत 1322 च्या लेवलवर बंद झाले. याशिवाय, बजाज फायनान्समध्ये 1.47 टक्के, ट्रेंटमध्ये 1.34 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 1.33 टक्के, एचडीएफसी बँकमध्ये 1.30 टक्के, कोटक महिंद्रा बँकमध्ये 1.15 टक्के आणि इन्पहसिसमध्ये 0.18 टक्के वाढ पाहायला मिळाली. भारती एअरटेल, एचसीएल टेक, इटरनल, एशियन पेंट्स शेअर्समध्ये घसरण झाली.
आधार फायनान्स
आधार हाउसिंग फायनान्सला इंडिया रेटिंग्सकडून स्टेबल आउटलुकसह ‘इंड एए+’ रेटिंग अपग्रेड मिळाले. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने बँक कर्ज सुविधांच्या व्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा करून ते ‘इंड एए/पॉझिटिव्ह’वरून ‘इंड एए+/स्टेबल’ असे अपग्रेड केले.
पैसाबाजारची ऑफर
पैसाबाजारने नवी ऑफर आणली. या ऑफर अंतर्गत ग्राहक पैसाबाजारद्वारे नवीन व्रेडिट कार्ड घेतील, ते पीबी पास मिळवण्यास पात्र असतील. हा पास मिळवण्यासाठी, ग्राहकांना व्रेडिट कार्ड बिलाचे पहिले पेमेंट अॅपद्वारे करणे आवश्यक आहे.
स्टॅपूचे मुंबईत पदार्पण
स्टॅपूचे मुंबईत पदार्पण झाले आहे. स्काय सिटी येथे आपले दुसरे स्टोअर सुरू केले आहे. दैनंदिन लेखन साहित्य, स्टेशनरी, नोटबुक्स व कागदी उत्पादने, आर्ट व कलर सप्लाय, ऑफिसच्या आवश्यक वस्तू, लाइफस्टाइल, शालेय साहित्य आणि 2000 पेक्षा जास्त वस्तू मिळेल.
एआय का@न्क्लेव्ह
एआय-सक्षम के-12 शिक्षण परिसंस्था एक्स्ट्रामार्क्सचे मुंबईत ‘एआय क्लासरूम का@न्क्लेव्ह’पार पडले. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनावर एआयच्या वाढत्या प्रभावाविषयी चर्चा करण्यासाठी 100 प्राचार्य, उपप्राचार्य, शैक्षणिक समन्वयक, आयटी प्रमुख सहभागी झाले.
आदित्य बिर्ला ग्रुपचे वायर्स अँड केबल्स व्यवसायात पदार्पण
आदित्य बिर्ला ग्रुपने अल्ट्राव्होल्ट या वायर्स अँड केबल्स व्यवसायात पदार्पण केले. यावेळी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष पुमार मंगलम बिर्ला उपस्थित होते. ग्रुपचा तीन वर्षांतील चौथा नवीन व्यवसाय ठरला आहे. 1,800 कोटींच्या गुंतवणुकीचे पाठबळ असणारी अल्ट्राव्होल्ट क्षमतेनुसार अल्ट्राव्होल्ट वायर्स विभागामध्ये दुसरी सर्वात मोठी कंपनी असेल. हा व्यवसाय पुढील 5 वर्षांत एक मोठा राष्ट्रीय ब्रँड बनून अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
डीपी वर्ल्ड वाढीसाठी विस्तारालाच प्राधान्य
डीपी वर्ल्डच्या ग्लोबल ट्रेड ऑब्झर्व्हेटरीच्या नवीन संशोधनानुसार वाढीसाठी विस्तारालाच सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. भारतीय व्यवसायांकडून पुरवठा साखळ्यांमध्ये वैविध्यपूर्णता आणि मालाच्या साठय़ात वाढ होते. पुरवठा साखळीतील बदलांसाठी उद्योग तयारी करत असताना 70 टक्के भारतीय उद्योग पुरवठादारांच्या वैविध्यपूर्णतेला प्राधान्य देत आहेत, तर 59 टक्के व्यवसाय मालाचा साठा वाढवत आहेत, अशी माहिती डीपी वर्ल्डचे भारतीय उपखंड, मध्य आशिया, लेवांत आणि इजिप्त विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रिझवान सुमर यांनी दिली.
जावाची 42 FJ सहा रंगात लाँच
जावा येझदी मोटरसायकल्सने जावा ऑल स्टार्सची सुरुवात जाहीर केली आहे. जावा 42 FJ ला ह्यूअर्स चॉईस बाईक ऑफ द इयर (2024) आणि ह्यूअर्स चॉईस मोटरसायकल ऑफ द इयर (2025) हे पुरस्कार मिळाले आहेत. जावा ऑल स्टार्स 42 FJ ची किंमत रुपये 2,01,942/- पासून सुरू होते आणि ती संपूर्ण भारतातील जावा येझदी डीलर्सकडे सहा वेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
रेंज रोव्हर स्पोर्ट ट्वेंटी एडिशन सादर
रेंज रोव्हर स्पोर्ट ट्वेंटी एडिशन भारतात सादर करण्यात आले आहे. रेंज रोव्हर स्पोर्ट ट्वेंटी एडिशन ही मर्यादित संख्येत उपलब्ध असेल. यात 395 किलोवॅट शक्ती, 750 एनएम टॉर्प आणि अवघ्या 4.5 सेपंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठण्याची क्षमता आहे. रेंज रोव्हर स्पोर्ट ट्वेंटी एडिशन आता भारतात 190 लाख या किमतीत बुकाRगसाठी उपलब्ध असेल. या एडिशनची डिलिव्हरी ही ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
निखिल प्रॉड्रक्ट्सचे लोबन धूप कप बाजारात
निखिल प्रॉड्क्ट्स बंगलोरच्या कंपनीने लोबन धूप कप बाजारात आणले आहे. लोबन धूप कप हे उच्च दर्जाच्या नैसर्गिक सुगंधी द्रव्यापासून तयार केले आहे. 12 कपांच्या पॅकिंगमध्ये असलेल्या कपाची किंमत 105 रुपये आहे. हे धूप कप मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे. संपर्क ः मुंबई-8655766778, 9769078365, 7506816272, ठाणे-9167658768, वाशी-8879374592

























































