
दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी दक्षिण विभागाने आता मोठा निर्णय घेतला आगे. पूर्व विभागाविरुद्ध दोन हात करण्यासाठी त्यांनी आपल्या संघात केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांचा समावेश केला आहे. बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मोकळय़ा असलेल्या या तीन स्टार खेळाडूंना विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण विभागाच्या संधी बळकट करण्यासाठी अंतिम सामन्यात खेळण्याचे निर्देश दिले आहेत. 6 सप्टेंबरपासून हा सामना होणार आहे.
पूर्व विभागाकडे मोहम्मद शमीसारखा एक घातक वेगवान गोलंदाज आहे, जो कोणत्याही फलंदाजीच्या फळीला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतो. याशिवाय पूर्व विभागात 15 वर्षीय फलंदाजीतील धडाकेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि स्फोटक फलंदाज ईशान किशन यांच्यासारखे सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. तिलक वर्माने पहिल्या डावात शतक आणि दुसऱया डावात नाबाद 51 धावा करून उत्तर विभागाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पण 13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणार असल्याने तिलक, ईशान आणि वैभव यांच्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता अनिश्चित आहे.



























































