
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला आणि त्याचे धागेदोरे मंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे ओएसडी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटील याच्या घरात भाडेकरू राहत होते आणि ते गायब असल्याचे कळते. याबाबत विचारले असता संजय राऊत यांन एमपीएससीची पेपरफुटी ही सरकारी कृपेशिवाय होऊ शकत नाही, असे म्हटले. तसेच मंत्री असले तरी नरहरी झिरवाळ यांना समन्स काढून चौकशीसाठी बोलवा, असेही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, नीट, यूपीएससी, एमपीएससी यासारख्या राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या सरकारी परीक्षा असतात त्याचे पेपर फुटणे हे सरकारी पाठिंब्याशिवाय किंवा सरकारच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही. आम्ही अनेक वर्षे या समित्यांवर काम करणाऱ्या लोकांच्या नियुक्त्या पाहिलेल्या आहेत. पण आता पूर्णपणे राजकीय नियुक्त्या केल्या जातात. आपापली माणसं भरणे आणि त्या माध्यमातून परीक्षा कंडक्ट करणे, त्याचा लाभ आपल्या सग्या सोयऱ्यांना, गोतावळ्यातील लोकांना होणे हे सध्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय स्पर्धांचे स्वरूप आहे, असे संजय राऊत म्हणाले.ॉ
तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला का असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, 10 दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना भेटलो आणि त्यांनी आजाराविषयी माहिती घेतली. तेव्हा त्यांनीही आपल्या सारख्या लोकांसोबत तुरुंगात काहीही होऊ शकते असे म्हणत संशय व्यक्त केला. त्यांनी मला एका टेस्टची माहिती दिली आणि तात्काळ करून घ्या असे सांगितले. कार हे सरकार इतके क्रूर आहे की आपल्यावर काहीही प्रयोग करू शकते. तुरुंगात या आजाराची सुरुवात झाल्याचे माझ्याही लक्षात आले. दिल्लीत चर्चा करताना जे लोक तुरुंगात होते त्यांची प्रकृती अचानक खालावतेय किंवा आजारी पडत आहेत. त्यातूनच असा संशय निर्माण होतोय आणि हे घडण्याची शक्यताही आहे, असेही संजय राऊत म्हणाले.































































